भारती विद्यापीठ आयएमईडी येथे डिजिटलायझेशन विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी ) तर्फे ‘ डिजिटलायझेशन अँड सस्टेनेबिलिटी:इनोव्हेटिव्ह एन्व्हार्यर्न्स फॉर फायनान्स अँड बिझनेस ‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ८ एप्रिल रोजी हे चर्चासत्र आय एम ई डी सेमिनार हॉल येथे झाले. भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आय एम ई डी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर हे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसाद बारजे, डॉ संदीप सहस्त्रबुद्धे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत एमबीए अभ्यासक्रमाचे १७४ विद्यार्थी सहभागी झाले .संयोजन समितीच्या वतीने डॉ.सोनाली धर्माधिकारी,डॉ. रणप्रीत कौर,डॉ. अनुराधा येसुगडे ,डॉ. सुचेता कांची ,श्रेयस डिंगणकर यांनी चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

Latest News