शरद पवार यांच्या निवासस्थानावरच्या हल्ल्याचा लोकजनशक्ती पार्टीकडून निषेध

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावरच्या हल्ल्याचा ‘लोकजनशक्ती पार्टी रामविलास’ या पक्षाने निषेध केला आहे.पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

‘आंदोलकांची डोकी भडकावून त्यांच्या जीवावर राजकीय पोळी शेकण्याचा हा प्रयत्न असून या हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या कटामागचा सूत्रधार शोधून कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,असे आल्हाट यांनी म्हटले आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर,पुणे शहर उपाध्यक्ष संजय चव्हाण,तसेच सचिन अहिरे,आदिनाथ भाकरे,संतोष पिल्ले,जीवन शिंदे यांनीही निषेध नोंदविला आहे.

Latest News