खा. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा : डॉ. कैलास कदम

खा. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा : डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. १० एप्रिल २०२२) महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी जो हल्ला झाला. या घटनेच्या मागील मुख्य सुत्रधार पोलिसांनी शोधून काढावा. तसेच या हल्ल्यात दोषी असणा-यांवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या हल्ल्याचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. रविवारी (दि. १० एप्रिल) शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या निषेध सभेत माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्षा सायली नढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, डाॅ. मनिषा गरूड, छायाताई देसले, राहुल ओव्हाळ, विजय ओव्हाळ, सतीश भोसले, आशा भोसले, तारिक रिझवी, हरीभाऊ वाघमारे, हिराचंद जाधव, संदिप शिंदे, हरीश डोळस, ज्ञानेश्वर मलशेट्टी, सुनिल राऊत, आबा खराडे, प्रा. किरण खाजेकर, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, रिटा फर्नांडिस, सीमा कलेक्टर, सुप्रिया पोहरे, सतिश पुलावळे, विशाल सरवदे, गौतम ओव्हाळ आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणी व्यतिरीक्त बहुतांशी सर्व मागण्या ४० टक्के पगार वाढीसह राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. विलिनीकरणाविषयी समिती नेमूण तिचा अहवाल आणि न्यायालयाचा निकाल मान्य करु असेही सरकारने सांगितले होते. विलिनीकरणाचा मुद्दा मा. न्यायालयाने देखील फेटाळला आहे. आता एसटी कर्मचा-यांनी सेवेत रुजू व्हावे अशी सर्वांची अपेक्षा असताना अचानकपणे कामगारांनी घेतलेला आक्रमकपणा संशयास्पद आहे. या घटनेमागील खरा सुत्रधार शोधून त्यांचावर कायदेशीर कडक कारवाई करावी. शरद पवार यांच्या घरावर हल्ला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील कामगार चळवळीला काळीमा फासणारी आहे असेही पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले.————————-

Latest News