‘विज्ञान नाटक घरोघरी ‘ सावरकर अध्यासन केंद्र आणि मॅप एपिक चा संयुक्त उपक्रम


पुणे :समाजातील वैज्ञानिक दृष्टीकोण वाढवण्यासाठी ‘विज्ञान आख्यान ‘ उपक्रमातून विज्ञान नाटक घरोघरी, सोसायट्यांमध्ये पोहोचविणार असल्याची माहिती सावरकर अध्यासन केंद्र आणि मॅप पिक कम्युनिकेशन्स च्या वतीने देण्यात आली .सावरकर अध्यासन केंद्र येथे सोमवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
सावरकर अध्यासन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर, मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांनी ही माहिती दिली.दोन्ही संस्थांच्या वतीने सावरकर अध्यासन केंद्र येथे एक महिन्याची ‘विज्ञान आख्यान ‘ही विज्ञान नाटक कार्यशाळा सुरू आहे. त्यातून निर्माण होणारी विज्ञान नाटके घरोघरी सोसायट्यांमध्ये नेण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले
जसा इतिहास नाटकाच्या माध्यमातून पर्यंत सर्वांपर्यंत पोचला,संतांचे विचार लोक संगीताच्या माध्यमातुन समाजा पर्यंत पोचले,तसेच वैज्ञानिकांचे शोध,त्या शोधा मागचे विचार, शोध लावताना आलेले अनुभव आणि त्या मुळे घडलेले प्रसंग हे समाजा पर्यंत पोचणे गरजेचे आहे. नाटकाच्या माध्यमातून वैज्ञानिक शोधांचा प्रवास शोधण्याने विज्ञानाची अनुभूती घेणे शक्य आहे. त्यातून गणित, शास्त्र शिकता येईल. या विचारातून उदयास आलेला उपक्रम म्हणजे “विज्ञान आख्यान” असून
हे विचार नाटकातून पोचविण्याचे असल्याने ” विज्ञान नाटक कार्यशाळा”, या एका महिन्याच्या कार्यशाळेत तयार झालेल्या नाटकांचे प्रयोग, पुण्याच्या विविध भागांत होणे गरजेचे आहे.
आम्ही सर्वांना आवाहन करतो की या नाटकांचे प्रयोग गृहसंकुला पासून ते विविध व्यासपीठांवर सादरी करणासाठी उपलब्ध करून द्यावे. या प्रयोगांसाठी आम्ही कुठलेही शुल्क आकारणार नाही. या संधीचा फायदा घेऊन विज्ञानाच्या पायाभूत गोष्टींकडे लक्ष देता येईल, असे पोहनेरकर, नामजोशी यांनी सांगीतले.
विनामूल्य नोंदणीसाठी 9890608049 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mandar.n@maappepic.com ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.