कुणीही जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील पत्रकारांशी बोलत होते. भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहेराज्यात सध्या मशिदींवरी भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना नाशिक पोलीस आयुक्तांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असून विनापरवानगी कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल. कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन हिंदु बांधवांना राज ठाकरे यांनी केले आहे. अशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत अशा स्वरुपाचे परिपत्रक जारी करणारे नाशिक हे पहिलेच शहर ठरले आहेतसेच मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत भोंग्यासाठी परवानगी घेण्याची मुभा असणार आहे. त्यानंतर मात्र अनधिकृत भोंगे जप्त करण्यात येऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मशिदीच्या 100 मीटर परिसराच्या आत हनुमान चालिसा पठणास मनाई करण्यात आली आहे.

Latest News