आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या लोकांनी करू नये- खासदार प्रीतम मुंडे

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आयत्या बिळात नागोबा अशी व्यवस्था झाली आहे, अशी जोरदार टीका प्रीतम मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना सगळी कामं मंजूर झाली आहेत. कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे, असं प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे.

बीड जिल्ह्यात सध्या एक जण घर बांधतोय आणि घराची वास्तूशांती दुसरा कोणीतरी करतोय, अशी अवस्था आहे. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या लोकांनी करू नये. सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत आहे, असं खोचक टोला प्रीतम मुंडेंनी लगावला आहे.बीड जिल्ह्यातील राजकारण काका-पुतन्या, भाऊ-बहीण यांच्या भोवती फिरताना दिसत असतं.

जिल्ह्यातील विकास कामांच्या मुद्द्यांवर मुंडे बहीण-भाऊ हे आता आमनेसामने आले आहेत. बीड जिल्ह्यातील विकास कामांवरून राजकीय श्रेयवादाची लढाईला आता पहायला मिळत आहे. त्यातच खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहेदरम्यान,  मुंडे बंधु-भगिणींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना अनेक विकासकामे मंजूर केली आणि आता दुसरे लोक विकासकामांचे श्रेय घेतात, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केला आहे.

Latest News