महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलच्या चिटणीसपदी डॉ. सुजित शिंदे

पुणे, प्रतिनिधी : 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या चिटणीसपदी डॉ. सुजित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर शेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका, डॉ. अभिजित बाबर, डॉ. संतोष सिंघवी उपस्थित होते.
          डॉक्टर सेलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याचे आवाहन मंत्री थोरात यांनी केले. तर संघटन विकास व पक्षाला जनाधार प्राप्त होईल, असे कार्य करण्याची अपेक्षा डॉ. राका यांनी व्यक्त केली. 
         आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना डॉ. सुजित शिंदे म्हणाले, की स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या काँग्रेसला मोठी वैचारिक परंपरा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या जोरावर पक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याला प्राधान्य राहणार आहे. तसेच आपली नियुक्ती सार्थ ठरविणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Latest News