ठाकरे सरकार आता नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार…
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये 12 सदस्यांच्या नावाची यादी मंजूर करण्यात आली होती. कॅबिनेटने मंजूरी दिल्यानंतर सदर यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही.राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न चर्चेत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही 12 नावांवर निर्णय दिलेला नाही. राज्यपाल निर्णय देत नसल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकवेळा टीका केली आहे. त्यातच आता नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान, नवीन यादीमध्ये सर्व प्रोटोकॉल पाळून नावे देण्यात येणार आहेत. राज्यपाल भगसिंग कोश्यारींची या नावांवर कोणतीही हरकत नसेल, असं अनेकांचे मत आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या नव्या यादीवर राज्यपाल निर्णय घेणार का?
अगोदरच्या यादीतील एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळेस राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांची यादी पाठवणार असल्याची माहिती आहे. राज्यपाल निर्णय देत नसल्यामुळे ही महाविकास आघाडी सरकारची नवी खेळी असल्याचं बोललं जात आहे.