ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण दोन धर्मात तणाव निर्माण करू नये- रामदास आठवले

मुंबई : बाळासाहेब ठाकरे कधीही भोंगे काढा असं म्हणाले नाहीत. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे. त्यामुळे भोंगे काढायला लावणं बरं नव्हे. भोंगे काढायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असेल, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना व राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टिचे (RPI) नेते रामदास आठवले यांनी देखील राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

भोंगे अनेक वर्षांपासून आहेत. राज ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण दोन धर्मात तणाव निर्माण करू नये. राज ठाकरेंनी अनेकदा भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग बदलला, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’, असा टोला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे मोठे नेते आहेत. पण आपल्या देशात लोकशाही आहे पेशवाई नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा खोचक सल्ला देखील रामदास आठवलेंनी दिला

Latest News