राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये…


(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – येत्या तीन ते चार दिवसात प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहेकाँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विषय अद्याप गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यामध्येच असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या प्रमुखांनी स्थापन केलेल्या समितीला प्रशांत किशोर यांच्या प्रवेशामध्ये काहीही सहभाग अथवा भूमिका नाही. किशोर यांनी काँग्रेसकडे ६०० स्लाईड्स असलेलं एक प्रदीर्घ प्रेझेंटेशन दिलं आहे. आत्तापर्यंत ते कोणीही संपूर्ण पाहिलेलं नाहीकाँग्रेसच्या वरिष्ठांशी गेल्या दोन दिवसांपासून सतत संपर्कात असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्ष मजबुतीसाठी प्रशांत किशोऱ यांनी सादर केलेल्या ६०० स्लाईड्सच्या प्रस्तावावर अद्याप विचारविमर्श सुरू असल्याची माहिती प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहेयाआधी किशोर यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये एकटं लढण्याचा सल्ला दिल्ला होता. तसंच तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात युती करायला हवी, असंही सुचवलं होतं.
त्यांचा हा सल्ला राहुल गांधी यांना पटला होता.प्रशांत किशोर हे १६ आणि १८ एप्रिल रोजी सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले होते. किशोर यांच्या प्रस्तावावर विचार करून काँग्रेस २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची दिशा ठरवणार आहे. यापूर्वी काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते.