राणे यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही कारवाई करून नये- मुंबई उच्च न्यायालय


मुंबई – सन्मानजनक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल गैर जबाबदारीने कोणतेही विधान करता कामा नये. तरुणांसमोर आदर्श उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.” न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या खंडपीठात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्याकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.नारायणे राणे यांनी त्यांच्या विरोधात धुळे जिल्ह्यात दाखल झालेली एफआयआर रद्द व्हावी, अशी मागणी केली होती. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात नारायण राणे म्हणाले होते की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्वातंत्र दिन कधी आहे, हे माहीत नाही”, असे विधान करत ठाकरेंना कानाखाली लगावण्याचीही धमकी दिली होती. त्यावरून राणेंना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका देण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे धुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही कारवाई करून नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.