आमदार जिग्नेश मेवानी यांना ट्विट्सवरुन अटक करण्यात आली का? अभिनेत्री स्वरा भास्करा

मुंबई –

जिग्नेश मेवानी हे मी आजवर भेटलेल्या सर्वात प्रतिबद्ध कार्यकर्त्यांपैकी आणि गतिमान आमदारांपैकी एक आहेत. अन्यायाविरुद्ध ते नेहमीच उभा राहिले असून उपेक्षितांपर्यंतची एकजूट त्यांनी दाखवली. ते लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. मात्र, आता जिग्नेस मेवानी यांना केवळ काही ट्विट्सवरुन अटक करण्यात आली आहे!, असे का? असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्करा हिने विचारला आहे. स्वरा आणि जिग्नेश मेवानी यांनी लोकसभा निवडणुकांवेळी कन्हैय्या कुमारचा प्रचारही एकत्र येऊन केला होता

गुजरातमधील वडगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे.पालनपूर सर्किट हाऊस येथून बुधावारी रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली. मेवानी यांच्या एका समर्थकाने यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, काही वेळातच सोशल मीडियावर मेवानी यांच्या अटकेचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता, जिग्नेश यांच्या समर्थनार्थ अनेकजण ट्विटरवरुन समोर येत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि कन्हैय्या कुमार यांनी या अटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आम्हाला दाखवली नाही. केवळ, आसाममध्ये दाखल असलेल्या काही गुन्ह्यांसदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, असे जिग्नेश यांच्या टीममधील कार्यकर्त्याने अटकेनंतर सांगितले आहे. मेवानी यांच्यावर कलम 120 ब (गुन्हेगारी कट), कलम 153(A) (दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 295(A), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि आयटीच्या अॅक्टच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ”गोडसेला देव मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे” असे ट्विट मेवानी यांनी केले होते. त्यावरुन, त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, जिग्नेश मेवानी यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेकांनी ट्विटरवरुन Why असे म्हणत मेवानींना अटक का, असा प्रश्न विचारला आहे. ट्विटरवरही #JigneshMewaniArrested हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. कन्हैय्या कुमारनेही जिग्नेश यांच्या अटकेनंतर लोकांन निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधीसोबत असा न्याय? अशी प्रश्नार्थक टिका सरकारवर केली आहे.

Latest News