सर्व धर्मीयांमध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध : डॉ. कैलास कदम

काँग्रेसच्या वतीने पिंपरीत रोजा इफ्तार पार्टीत गरीब विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप

पिंपरी ( दि. 24 एप्रिल 2022) भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विविध धर्मीयांमधील हे
सलोख्याचे संबंध आणखी वृद्धिंगत व्हावे यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी
(दि. २२ एप्रिल) सायंकाळी खराळवाडी पिंपरी येथील जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. कदम बोलत होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसने अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सायंकाळचे नमाज पठण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, माजी महापौर कविचंद भाट, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, माजी नगरसेवक सद्गुरू कदम यांच्या हस्ते अल्पसंख्यांक समाजातील गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जामा मस्जिदचे मुफ्ती आयुबभाई इनामदार, हाफीजी अजमतभाई शेख, माजी महापौर कविचंद भाट, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष दिनकर भालेकर, इस्माईल संगम, तारीक रिझवी, सौरभ शिंदे, किरण नढे, विजय ओव्हाळ, आबा खराडे, हिराचंद जाधव, आकाश शिंदे, डॉ. मनिषा गरुड, आण्णा कसबे, प्रा. किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, उमेश बनसोडे, जेव्हीयर ॲन्थोनी, संदिप शिंदे, रिटा फर्नांडीस, सीमा कलहट्टी, हरीश डोळस, मोहसिन शाह, हाजू शेख, हुसेन शेख, समीर तांबोळी, महमूदभाई पठाण, फारूक कुरेशी, आयुब कुरेशी, गफूर कुरेशी, मुन्ना दिकसंगी, मोहसीन शेख, इम्रान सय्यद, तोहसिब सय्यद, याकुब इनामदार आदी उपस्थित होते.

Latest News