गृहखात्यावर दिलीप वळसे पाटील याचे नियंत्रण नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजप नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. सरकारने संवादाला जागाच ठेवली नसून राज्यात हिटलरशाही सुरु आहे, त्यामुळे भोंगा बैठकीला बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, गृहखात्यावर दिलीप वळसे पाटील याचे नियंत्रण नाही. सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री हजर नाहीत, तर या बैठीकीला जाऊन काय फायदा आहे असेही फडणवीस म्हणाले.राज्यातील भाजप नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोहित कंबोज यांचा मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. किरीट सोमय्यांवर पोलिस असतानाही हल्ला झाला. ज्यांना लोकशाही मान्य नाही ते आमच्या पोलखोल आंदोलनावर हल्ला करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांव बोगस केसेस केल्या जात असल्याचा आरोप केला.विरोधी पक्षांना संपवण्याचा घाट सुरु आहे.