16 वर्षीय मुलीस सूसगाव मधून अज्ञात इसमाने फूस लावून पळविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या साडूच्या सोळावर्षीय मुलीस शुक्रवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता सूसगाव येथून एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले एका सोळावर्षीय मुलीस तिच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेल्याची घटना मुळशी तालुक्यातील सूसगाव येथे घडली आहे.फिर्यादी यांनी नातेवाइकांकडे शोध घेऊन शनिवरी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

पिंपरी : एका सतरावर्षीय मुलास आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवार (दि. 22) रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी यांच्या सतरावर्षीय मुलास चिंचवड येथील रामनगरमधून कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहेअशी तक्रार शनिवार (दि. 23) फिर्यादी यांनी दिली. पिंपरी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

Latest News