कोंढवा येथील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग…

पुणे : मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचरचे गोडाऊन आहेत. त्यातील एक गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली. गोदामात लाकडी साहित्य आणि सोफ्यासारखे साहित्य असल्याने आगीेने काहीवेळात रौद्ररुप धारण केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जवानांकडून केले जात आहेत. मात्र, लाकडे साहित्य आणि फोमयामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असून, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच यामध्ये कोणत्याही जीवित हानीचे वृत्त समोर आलेले नाही.
मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.शहरातील कोंढवा कोंढवा बुद्रुक येथील पारगे नगर येथील फर्निचरच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 फायरगाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.