खा नवनीत राणा यांचे आरोप खोटे सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई:- ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई | . पोलीस ठाण्यातील वागणुकीसंदर्भात आपण चौकशी केली असून तशी वस्तूस्थिती दिसत नाही, तरीही त्याचा तपशील लोकसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून गैरवागणूक होत असल्याचा आरोप खा नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे भाजप मोठ्या प्रमाणवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळत त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा, गंभीर इशारा ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) सध्या न्यायलयीन कोठडीत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कोठडीत असूनही राणा दाम्पत्य सरकारवर गंभीर आरोप करत असलेले पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर इशारा दिला आहे दरम्यान, राणा दाम्पत्यांकडून मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार येणार होतं. यावरुन शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले होते.

Latest News