राष्ट्रवादी हा तमाशाचा फड आहे आणि त्यात मिटकरी नवीन नाचा :सदाभाऊ खोत

सांगली :हनुमान चालिसाबाबत राणा दांपत्याने घोषणा केल्यानंतर काही अंतरावर रोखता आले असते. आम्ही मंत्री असताना आमच्या घरावर कांदा, टोमॅटो फेकले गेले. भजन-कीर्तन आंदोलन झाले. मी त्या आंदोलकांना चहापाणी दिले होते. तुम्ही राणा दांपत्याला अटक केली. घरात जाऊन अटक केली. राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. हे चुकीचे आहे. सोमय्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत नाही. पवारांच्या घरावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनावर गुन्हा दाखल करता. खादी आणि खाकीची युती झाली आहे. सरकारचे सगळे नेते भ्रष्टाचार करत आहेत आणि तो लपण्यासाठी शकुनी मामा मिडियासमोर येऊन मळमळ काढत आहेत. जनतेला विकासाचे सांगा. लोक कल्याणाचे काहीतरी सांगाआमदार अमोल मिटकरी एक चांगले वक्ते होते. वक्तृत्वाच्या जोरावर अनेक विषय मांडले, मात्र डुक्कर कितीही चांगले असले, त्याला साबणाने अंघोळ घातली तरी ते गटारात जाते. राष्ट्रवादीच्या गटार गंगेत ते गेले आहेत. राष्ट्रवादी हा तमाशाचा फड आहे आणि त्यात मिटकरी नवीन नाचा आहे. फड मालक त्याचा आनंद घेत टाळ्या वाजवत आहेत, अशी जोरदार टीका माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली
श्री. खोत म्हणाले, ‘‘कर्जमाफी, महापूर, चक्रीवादळ यात राज्य सरकार मदत करू शकले नाही. लोड शेडिंग वाढून ठेवले आहे. एकामागून एक आत्महत्या होत आहेत. गाळपाविना १५ लाख टन ऊस पडून राहणार आहे. त्यावर सरकार बोलायला तयार नाही. त्याविरुद्ध जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम आम्ही करणार आहोत. मराठा समाज आरक्षण, ओबीसी समाज राजकीय आरक्षण यात सरकार न्याय देऊ शकलेले नाही. सरकार सामान्य माणसाचा आवाज दाबत आहे. परीक्षांत घोटाळे, आरोग्य परीक्षा घोटाळा यावर सरकार काही बोलायला तयार नाही. सरकार भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेले आहे.’’