कर्नाटकमध्ये पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दिव्या हागारगी ला पुण्यातुन अटक…


पुणे – कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा पुढे आला आहे. या प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी आत्तापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये भाजपच्या कलबुर्गी येथील महिला विभाग अध्यक्षा व नेत्या दिव्या हागारगी यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटकच्या “सीआयडी’ने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी या प्रकरणाचा कसून तपास करीत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून त्या पोलिसांना गुंगारा देत होत्या. दरम्यान, पोलिसांनी पोलिसांनी त्यांचा पती राजेश हागारगी याला यापुर्वीच अटक केली आहे
कर्नाटकातील (Karnataka) बहुचर्चित पोलिस उपनिरीक्षक (Sub Inspector of Police) भरती घोटाळा प्रकरणातील (Recruitment Scam Case) मुख्य आरोपी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दिव्या हागारगी (Divya hagaragi) यांना कर्नाटक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) (CID) शुक्रवारी पुण्यातुन अटक (Arrested) केली. भरती घोटाळा उघडकीस आल्यापासून दिव्या हागारगी या पोलिसांना गुंगारा देत होत्या.दरम्यान, गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयात भरती घोटाळा प्रकरणी आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत हारागीर यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर कर्नाटक “सीआयडी’ने हारागीर यांचा सगळीकडे शोध घेण्यास प्राधान्य दिले होते.