प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबीर


प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबीर
पुणे:
मॉडर्न विकास मंडळ पुणे यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत,साकेत सोसायटी सभागृह, शिवतीर्थनगर , पौड रस्ता, कोथरूड येथे होणार आहे. या शिबीराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. बढेकर ग्रुप, स्मार्ट पुणे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे शिबीर होत असून , पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सौ. मनीषा बुटाला हे या शिबिराचे निमंत्रक आहेत. मॉर्डन विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संयोजन केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.