50 वर्षाचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, पडळकर यांनी पवारांवर निशाणा…


पुणे : सध्या राज्यात विविध कारणावरुन राजकारण चांगलंच तापलंय. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष यांच्यावर जोरदार टीका केलीय. बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.पुण्यातील (कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना आमदार पडळकर यांनी पवारांवर टीका केलीय. त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, असं म्हटलंय
पडळकरांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र शरद पवार यांच्यावर होता. दरम्यान, आरपीआयसह (RPI) राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केलाय. तसंच, संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम 50 वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं आमदार पडळकरांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.