पुणे रेल्वे परिसरात बॉम्बबॉम्ब ठेवल्याची अफवा, आरोपी गजाआड

पुणे : तीन मे रोजी दुपारी चारच्या सुमारास शहर पोलिस नियंत्रण कक्षास अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी आला. ‘महेश कवडे नावाच्या व्यक्तीने पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवला आहे. तो बॉम्ब कोठे ठेवला आहे, याची माहिती हवी असल्यास मला सात कोटी रुपये द्या,’ अशी मागणी त्या अज्ञात व्यक्तीने केली.

या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या

. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद कोपीकर आणि इरफान शेख यांनी लोहमार्ग आणि शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म, पार्सल ऑफिस, स्वच्छतागृहे, रेल्वे ट्रॅक अशा ठिकाणी बॉम्बसदृश्य वस्तूंचा शोध घेतला. परंतु काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.त्यानंतर पोलिसांनी खोटा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केली

. सहायक पोलिस निरीक्षक श्वेता पाटील, पोलिस हवालदार लक्ष्मी कांबळे, सुनील कदम, अमरदीप साळुंके, संतोष जगताप, सचिन राठोड, रुपेश पवार, अमित गवारी, उदय चिले, संदीप काटे माधव केंद्रे आणि चालक पन्हाळकर यांनी वाघोली परिसरातून भीमाजी काळे याला ताब्यात घेतले. त्याने सूरज ठाकूर याच्याकडून घेतलेल्या सिमकार्डचा वापर करून नियंत्रण कक्षास कॉल केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी ठाकूर याला रांजणगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक निरीक्षक बाळासाहेब अंतरकर करीत आहेत.

Latest News