महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती

पुणे :

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते, सोशल मीडिया राज्य समन्वयक, संघर्ष सोशल फौंडेशनचे संस्थापक चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती झाली आहे. वरळी, मुंबई येथे बुधवारी त्यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिबेन शहा (राज्यमंत्री दर्जा) तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते. राज्यातील बालकांचे हक्क व संरक्षणासाठी आयोगाच्या माध्यमातून जोमाने प्रयत्न करु, असे चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले.

चैतन्य पुरंदरे गेली 15 वर्षे संघर्ष सोशल फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

सामान्य कार्यकर्त्याला संधी
………………..

चैतन्य पुरंदरे यांनी सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, सहकारी, व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते तसेच राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्रीगण,नेते-पदाधिकारी, पुण्यातील मान्यवर नेते-पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच संघर्ष सोशल फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, माझे कुटुंबीय या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या जबाबदारीच्या पदाला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन

Latest News