राम-रहीम फाऊंडेशनच्या ‘ ईद मिलन’ मधून एकोप्याचा संदेश !
 
                
पुणे :
धर्मा- धर्मामध्ये, जाती -जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच कोंढवा येथील राम-रहीम फाऊंडेशनने धार्मिक एकोपा निर्माण करण्याकरिता रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून ईद मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास कोंढवा भागातील सर्व धर्मीय बांधव सामील झाले होते .
राम -रहीम फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष सलीम हनीफ खान, प्रवीण शर्मा,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,नंदा लोणकर,नारायण लोणकर,इकराम भाईजान,माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक तानाजी लोणकर,मोहसीन हसन शेख,हफीज शेख,फरीद खान,संजय कांबळे,शोएब शेख,समीर पठाण,अॅड.माने,कुमेल रझा,अस्लम बागवान,नूर शेख. आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप यांनी सध्या विविध जाती धर्मात तेढ वाढविण्याचा काही शक्ति प्रयत्न करीत आहेत.मात्र आपल्या देशातील सुज्ञ नागरिक त्यास बळी न पडता आपला सामाजिक सलोखा जपत आहेत व वाढवत आहेत असे संगितले. सलीम हनीफ खान यांनी उपक्रमाची माहिती दिली . हे आयोजन गेले सोळा वर्ष करण्यात येत आहे असे सांगितले.

 
                       
                       
                       
                      