*’हू किल्ड जज लोया ?’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन*

*’हू किल्ड जज लोया ?’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन*

पुणे :ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया ?’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार,दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित हा प्रकाशन समारंभ गांधी भवन(कोथरूड) येथे होणार आहे.संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,विजय बोडेकर,सचिन पांडुळे,नीलम पंडित,कमलाकर शेटे,सुदर्शन चखाले,अजय नेमाणे,रोहन गायकवाड,रेश्मा सांबरे,प्रसाद झावरे हे संयोजन करीत आहेत.*पाठपुरावा करून निर्भीड लेखन* :……………………
माजी न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या गुढ मृत्यूबद्दल पत्रकार निरंजन टकले यांनी २०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात लिहीलेल्या लेखमालिकेने देशात खळबळ उडवून दिली. निरंजन यांचे आयुष्य त्यामूळे पुर्ण बदलून गेले. अनेक आव्हाने समोर आली. प्राण पणाला लावून ते लिहीत राहीले, बोलत राहीले. त्यांनी अखंड संचार केला. अनेक दिवस पाठपुरावा करून , पुरावे गोळा करून लिहीलेल्या या प्रकरणाचे सर्व तपशील आता पुस्तकाच्या रूपाने भेटीस येत आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने हा प्रेरणादायी संघर्ष समजावून घेता येईल ………….

Latest News