झारखंडमधील बहुचर्चित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरावर ED धाड 19 कोटी जप्त


झारखंड: झारखंडमधील बहुचर्चित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने धडक कारवाई केली. त्यांच्या ‘सीए’च्या घरातून तब्बल १९. ३१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. पूजा सिंघल या झारखंडमधील खाण आणि उद्योग सचिव आहेत. ‘ईडी’ने एकाचवेळी त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. या कारवाईत एकुण १५० कोटीच्या संपत्तीचे कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
मनरेगा योजनेतील घोटाळाप्रकरणी कनिष्ठ अभियंता रामविनोद सिन्हा यांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्याची ४.२५ लाखांची संपत्तीही जप्त केली होती. चौकशी त्याने पूजा सिंघल यांना पैसे दिले जात असल्याची माहिती दिली. यापूर्वीच केंद्र सरकारने राज्य सरकारकडे प्राप्त उपन्नांपेक्षा अधिक संपत्ती असणार्या अधिकार्यांची यादी मागितली होती. तसेच याच्यासंदर्भात सर्व माहिती देण्याचेही आदेश राज्य सरकारला दिले होते
. सुमारे एक महिन्यांपूर्वी झारखंड सरकारने चार अधिकार्यांची नावे दिली होती. यामध्ये पूजा सिंघल यांच्या नावाचा समावेश होता..
‘ईडी’ने पूजा सिंघल यांचे पत[ अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांच्याकडून १९ कोटी ३१ लाखांची रोकड जप्त केली. तसेच विविध ठिकाणी असणार्या १५० कोटी रुपयांहून आर्थिक गुंतवणूक असलेले कागदपत्रेही जप्त केली आहेत. शुक्रवारी एकाचचेळी रांची, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे ईडीने छापे टाकले. रांची येथील कारवाई ईडीचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली
. त्यांचे सीए सुमन कुमार यांचे कार्यालय व घर, पती अभिषेक झाला यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर यांच्या निवासस्थान, पूजा सिंघल यांचे भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थानीही ईडीने छापे टाकत मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.डेहराडून येथे पूजा सिंघल यांचा जन्म झाला. शाळेत आणि कॉलेजमध्ये त्या टॉपर होत्या. २००० या वर्षी पहिल्याच प्रयत्नात
त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यावेळी त्याचं वय केवळ २१वर्ष सात दिवस एवढे होतं. यामुळे त्या बॅचमधील सर्वात कमी वयाच्या त्या आयएएस अधिकारी ठरल्या. त्यामुळे त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉडमध्ये नोंदवली गेली. मात्र सर्वोच्च पदावर गेल्यानंतर मात्र त्यांची कारर्कीद व व्यक्तिगत जीवन हे चर्चेत राहिलं. आता तर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे.
आयएएस झाल्यानंतर पूजा सिंघल यांचा पहिला विवाह हा आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याबरोबर झाला. मात्र काही महिन्यांमध्ये त्यांच्यात मतभेद सुरु झाले. दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर पूजा यांनी व्यावसायिक अभिषेक झा यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. मात्र अति महत्त्वाकांक्षा असणार्या अधिकारी अशी ओळख असलेल्या पूजा सिंघल यांनी पती आणि
सासरच्या मंडळीच्या आर्थिक फायद्यासाठी कायदे पायदळी तुडवत निर्णय घेतल्याचा आरोप मागील काही वर्ष होत होता
. आता ‘ईडी’च्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्ता समोर आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सिंघल या चतरा येथील उपायुक्त होत्या. ययावेळी मनरेगा योजनेतून त्यांनी दोन स्वयंसेवी संस्थांना ६ कोटी रुपये मंजूर केले होते. याप्रश्नी झारखंड विधानसभेतही विरोधकांनी सरकारला प्रश्न केले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना याप्रकरणी क्लिन चीट मिळली होती
पलामूमध्ये उपायुक्त असताना एका कंपनीला अत्यंत अल्पदरात कोळसा खाण उत्खननाची परवानगी देण्यात आल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काही लक्षणीय कामगिरीही केली. यामध्ये हजारीबाग येथे विद्यार्थ्यांना दिली जाणार्या मोफत पुस्तकांच्या विक्रीचा भांडाफोड त्यांनी केला.