टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक अधिकार : खा. नवणीत राणा

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. , त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचं उल्लंघन केलंय, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात करत आता न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली आहेखां.नवनीत राणा म्हणाल्या की, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही. तसेच टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले आहे. आमच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारते वक्तव्य केलेले नसल्याचेही राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुरुंगात असताना आणि एकूण झालेल्या गोष्टींवर भाष्य करण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. त्यानुसार मी भाष्य केलं आहे. जर दुसऱ्यांच्या हक्कासाठी मी लढत असेल. तर, मी माझ्या स्वतःच्या हक्कासाठी तर लढूच शकते असे राणा यांनी सांगितले

. कोर्टाने दिलेली नोटीस अद्याप पाहिलेली नसून, कोर्टाने जे काही प्रश्न विचारले आहेत. त्याचा मान ठेवत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे लीगल टीम देईल

उद्धव ठाकरेंना नौतिकतेचा भाषा करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रामचे नाव घेण्यासाठी आयुष्यभर जरी मला कुणी तुरुंगात टाकणार असेल तर आपण जाण्यास तयार आहे. देवाच्या नावावर तुरुंगात जाणारी पहिली महिला असल्याचा गर्व असल्याचेही यावेळी राणा म्हणाल्या