अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ बनवायचे असल्याचा इम्रान खान खळबळजनक दावा…


पाकिस्थान : आमचा देश आणि आदिवासी भाग उद्ध्वस्थ केला. आणि यानंतर त्यांनी लष्करी तळाची मागणी सुरू केली,. तर मी यासाठी कधीच तयार नसल्याचंही माजी पंतप्रधान इम्रान खान गेल्या महिन्यातच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर इम्रान खान यांनी अमेरिकेला (USA) पाकिस्तानात लष्करी तळ बनवायचे असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात लष्करी तळ बनवण्याची मागणी केली होती. मात्र, मी त्याला नकार दिला. अमेरिकेच्या मागणीसाठी मी कधीच तयार नव्हतो आणि तिथूनच आमच्या अडचणी वाढण्यास सुरूवात झाली, असं देखील इम्रान खान म्हणाले आहेत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांविरोधातील युद्धात पाकिस्तानातील 80 हजार लोकांनी आधीच जीव गमावला आहे. असं असूनही त्यांच्या बलिदानाचे कधीच कौतुक झाले नाही. उलट अमेरिकन राजकारणी आम्हालाच जबाबदार धरू लागले, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.