पुणे शिवण्यातील क्लब वर छापा..


पुणे शिवण्यातील क्लब वर अखेरीस मध्यरात्रीनंतर १ वाजता पोलिसांनी छापा मारला आणि २२ जणांना रंगेहाथ पकडून अटक केली .पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच संदीप कर्णिक,रामनाथ पोकळे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजेश पुराणिक ,फौजदार पांढरकर ,पोलीस अंमलदार राजेश कुमावत ,बाबा करपे,नीलम शिंदे,मनीषा पुकाळे ,हनुमंत कांबळे ,इरफान पठाण,अश्विनी केकाण यांनी हि कारवाई करून येथून २ लाख ३० हजाराचा ऐवज जप्त केला. १५ टेबल आणि ६५ खुर्च्या लाऊन येथे रात्रभर जुगार अड्डा चालू असे .बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात हा क्लब सुरु होता .