विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती


पिंपरी, प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशालभाऊ वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांच्या आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विशालभाऊ वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना विशालभाऊ वाकडकर यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे, असेही विशालभाऊ वाकडकर म्हणाले.