भाजपमध्ये कोण होते माहीत आहे सगळ्यांना….


भाजपमध्ये कोण होते हे माहीत आहे सगळ्यांना. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप पण म्हणणार का आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा सवालदेखील त्यांनी यावेळी पटोलेंना केला. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी बुधवारी केला होता.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी चांगलाच समाचार घेतला. पाठीत खंजीर खुपसला हे पटोलेंचं विधान हास्यास्पद आहे. नाना पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पहावी. खंजीर, तलवारी खुपसल्याचं वक्तव्य आम्ही कधी करत नाही. आज मुंबई येथे पत्रकारांशी बोलत असताना पवार यांनी हे मत व्यक्त केलं.एकोप्याने राहणे गरजेचे आहे. संघटनेमध्ये प्रत्येकाने मिळून काम करावं लागतं. महाविकासआघाडी असेल तरच 145चा आकडा गाठणे शक्य आहे. आमचं आघाडीचं सरकार आहे. पण राज्यापातळीवर निर्णय घेत असताना राज्य पातळीवरील नेते निर्णय घेतात. स्थानिक पातळीवर सर्व नेत्यांनी एकत्र काम केले तर सर्व प्रश्न सोडवणे सोपे जाईल. राष्ट्रवादीने जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णयाच्या मुभा दिलेल्या आहेत. यासाठीच गोंदियात भाजप राष्ट्रवादी एकत्र आले.स्थानिक स्वराज्य निवडणूकांबाबत सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करावाचं कराव लागेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये कार्यालय काढणार असल्याच्या युपी सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.