पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

मुंबई |राष्ट्रवादीचे पदाधाकारी स्वप्निल नेटके यांनी केतकी चितळे विरोधात गु्न्हा दाखल केला आहे. नेटके यांनी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात कलम 500, 501, 503 A आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून केतकीला अटक होण्याची शक्यता आहे. केतकीनं शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केली असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.दरम्यान, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून केतकी घराघरात पोहोचली होती. शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली आहे. लबाडाचा लबाड, तूला ब्राम्हणांचा मत्सर, तू तर मच्छर अशा खालच्या शब्दात केतकी चितळेने शरद पवारांवर टीका केली होतीशरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर केतकी चितळे चांगलीच ट्रोल होत आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे

Latest News