…हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा- खासदार नवनीत राणा

महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना आणि शिवरायांना मानणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवर हार अर्पण करतात. सगळ्यात मोठा गुन्हा या लोकांनी केला आहे.माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडलं आहे. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा. असे आवाहन खां नवणीत राणा यांनी केले आहे

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचे दाखवण्यात येत आहे. जर एवडी ताकद ताकद आहे तर त्यांची दात तोडून दाखवा तर आम्ही मानतो असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यानी अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवावे असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांनी नंतर माघार घेतली आहे. तर आता महाराष्ट्रातील संकट मुक्तीसाठी दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे

.खासदार नवनीत राणा यांना मुंबईत हनुमान चालिसाच्या घोषणेमुळे तुरुंगात टाकले, त्यामुळे आता राणा दाम्पत्याने शहर बदलले. अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आता दिल्लीतून उद्धव सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे.

महाराष्ट्रासारखा धोका दिल्लीला नाही हे राणा दाम्पत्याला चांगलेच माहीत आहे. अन्यथा मुंबईत उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणाने पतीसोबत थेट दिल्ली गाठली आणि तेव्हापासून दोघेही इथेच थांबले आहेत.अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करणार आहेत.

दोघेही त्यांच्या घरापासून पायी मंदिरात जातील, जे त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे ठाकरेंच्या सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने म्हटलं आहे.

Latest News