बाई तू, माहिला असलीस तरी छपरीच तू.- रूपाली ठोंबरे पाटील


मुंबई | रूपाली ठोंबरे यांनीही एक पोस्ट करत केतकी चितळेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चि चि चवताळलीस बाई तू, माहिला असलीस तरी छपरीच तू. संस्कार नसलेली केतकी इतकीशी कशी चवताळलीस. हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहिजेत, असा घणाघात रूपाली ठोंबरे यांनी केला आहे
.दरम्यान, कशात ना मशात केतकीबाई तमाशात. लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला. मिळणारच बाई तुला चोप, असा इशारा देखील रूपाली ठोंबरे यांनी दिला आहे. या पोस्टसोबत रूपाली ठोंबरे यांनी सडकी असा हॅशटॅग देखील वापरला आहे.आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असलेली अभिनेत्रीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे.केतकीने तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे
.लबाडाचा लबाड, तू तर मच्छर, तुला ब्राम्हणांचा मत्सर, अशा खालच्या शब्दांत केतकीने पवारांवर टीका केली. यानंतर या पोस्टवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे.