भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला

मुंबई | पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि तो आम्ही पाळला. मात्र, भाजपला वाढवण्यासाठी राष्ट्रवादी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही विरोध करतो, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.दरम्यान, येणाऱ्या निवडणुकात हायकमांड योग्य निर्णय करेल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप देखील नाना पटोलेंनी केला होतानाना पटोलेंनी केलेला आरोप हस्यास्पद असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी लगावला होता. अजित पवारांच्या प्रतिक्रियेवरून नाना पटोलेंनी आणखी एकदा राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलं आहे