वाढत्या महागाईमुळे संतप्त काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला काँग्रेसने त्यांचा वाढत्या महागाईवरून जाहीर निषेध केला. स्मृती इराणी हॉटेल वर पोहच्याच्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच स्मृती इराणी यांनी भेटण्यासाठी आणि त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला,

मात्र यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं, दरम्यान त्यांच्याशी झटापट झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुणे दौऱ्यावर आहेत, दरम्यान त्यांच्या या भेटीदरम्यान महिला कॉंग्रेसतर्फे वाढत्या महागाईविरोधात निषेध व्यक्त करत चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले

. वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे. पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन. वाढती महागाई व गॅसच्या वाढलेल्या दराबद्दल स्मृती इराणी यांना चूल व बांगड्या भेट देतांना पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. पूजा मनिष आनंद यांच्या सह अन्य महिला कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.


Latest News