सोलापूरचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू- आमदार प्रणिती शिंदे


सोलापूर : उजनीचे पाणी 20 वर्षापूर्वी सुशीलकुमार शिंदेयांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले. आता उजनी प्लसमध्ये असूनही महापालिकेकडून याचे नियोजन होत नाही. महापालिकेमध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते. तेव्हा तर उजनी धरण मायनसमध्ये होते तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला होता, असेही शिंदे यांनी सांगितले.त्याच बरोबर पृथ्वीराज चव्हाणहे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन एका रात्रीत पाणी आणले. राज्यात दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो का, असा रोखठोक सवाल त्यांनी केलामला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे. सोलापूरकरांचे पाणी जर दुसरीकडे वळवले तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हांला रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका, अशी भूमिका आमदार शिंदे घेतली आहे. सोलापूरचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू, असा इशारा काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही, मी लहानपणापासून सत्ता पाहिली असल्याचेही शिंदे म्हणाल्या. उजनी धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट