राजीव गांधी यांचा मारेकरी ए. जी. पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश…


तामिळनाडू: सरकारने पेरारिवलनच्या सुटकेसाठी प्रस्ताव मंजूर केला होता. पेरारिवलनची दया याचिका राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे बराच काळ प्रलंबित राहिल्याने न्यायालयाने मोठा निर्णय घेत त्याची सुटकेची याचिका मंजूर केली.सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 नुसार प्राप्त विशेषाधिकाराचा वापर करत सुटकेचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आपल्या गावी असलेल्या पेरारिवलन व त्याच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रकरणातून मुक्त झाल्यानंतर आता काही काळ मोकळा श्वास घेऊ द्या, असं पेरारिवन म्हणाला आहे
.मृत्यूदंडाच्या शिक्षेची गरज नाही, अशी भावनाही त्याने व्यक्त केली आहे. मी आताच बाहेर आलो आहे. मागील 31 वर्ष न्यायालयीन लढा सुरू होता. मला आता थोडा मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला काही वेळ द्या, असं तो आपल्या भविष्याबाबत विचारल्यानंतर म्हणाला.मृत्यूदंडाच्या शिक्षेचा गरज नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. केवळ दयेसाठी नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांना असंच वाटतं. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक जण माणूस आहे, अशी अपेक्षाही पेरारिवलन याने व्यक्त केली
या निकालामध्ये उर्वरित सहा जणांच्या सुटकेचा मार्गही मोकळा झाल्याचे मानले जात आहे.राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तमिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 11 जून रोजी पेरारिवलन याला अटक कऱण्यात झाली होती. हत्याकांडात वापरण्यात आलेल्या बॉम्बसाठी नऊ व्होल्टच्या बॅटरीची खरेदी करून मास्टरमाईड शिवरासनला देण्याचा आरोप पेरारिवलनवर होता पेरारिवलन हा घटनेवेळी 19 वर्षांचा होता. मागील 31 वर्ष तो तुरुंगात होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्याला टाडा न्यायालयाने 1998 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. पण 2014 मध्ये या शिक्षेचे रुपांतर आजीवन कारावासामध्ये करण्यात आले.