राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल, कोणी कितीही आकडे मोड करावी… संजय राऊत

राज्यातील बदललेल्या समिकरणांनुसार भाजपचे (BJP) दोन उमेदवार व शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचा (Congress) प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केल्यानंतर संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. तर आता भाजपही तिसरा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे

.राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 6 जागांसाठी राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सहा जागांसाठी चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.कोणी कितीही आकडेमोड करा. सहावी जागा शिवसेनाच लढवेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. कोणी कितीही आकडेमोड करावी, आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे आणि जितेंगे, असा विश्वासही संजय ऊतांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागली आहे. भ्रष्टाचारातून पैसा आणि त्यातून घोडेबाजार. हे दुष्टचक्र कधी थांबेल? असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Latest News