मोशी मध्ये अनेक बांधकामे उधवस्त,व्यावसायिक पत्राशेड वर अतिक्रमन विभागाची कारवाई

पिंपरी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने मोशी ते भारतमाता चौक , व्यावसायिक पत्राशेड वर अतिक्रमन कारवाई अनेक बांधकामे उधवस्त

पिंपरी ( परिवर्तनाचा सामना ) पिंपरी चिंचवड शहरातील ई” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे नाशिक रस्त्यावरील ६१ मीटर दुतर्फा रस्ता रुंदिमधील सलग पाचवा दिवशी प्रभाग क्र.०३ मौजे मोशी (भारतमाता चौक ते मोशी टोलनाका) येथे आज महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली.

पिंपरी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने मोशी ते भारतमाता चौक , व्यावसायिक पत्राशेड वर अतिक्रमन कारवाई”करून सर्वच बांधकामे उधवस्त करण्यात आली आहेत त्यामुळे आज रस्ते मोकळा श्वास घेऊन लागली आहेतअनधिकृत पत्राशेड बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी,बुधवारी मोठ्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

सुमारे 45 व्यासायिक पत्राशेड दुकानांवार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये ०९ (आर.सी.सी.) 41 बांधकामे निष्कासित करन्यात आली व 45 पत्र्याची व्यावसायिक शेड वर कारवाई करण्यात आली . सदर बांधकामाचे अंदाजे क्षेत्रफळ (१३५०३ चौ. फुट) आहे.सदर कारवाई मध्ये सहायक आयुक्त राजेश आगळे,कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता अमर जाधव,स्थापत्य सहाय्यकअमित पवार,ज्योती चांदगुडे, सतिश डांगे,रिनल तिडके,रुपेश भुराने,चंद्रकांत पाटील,धनश्री हांडे सहभाग घेतला

“ई” क्षेत्रिय कार्यालयाचे संपुर्ण धडक कारवाई पथक, इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच मनपा , भोसरी MIDC पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक -१. सहायक पोलीस निरीक्षक -२ इतर पोलीस कर्मचारी ४२ तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक, अग्निशामक विभागाचे अग्निशामक दल, आरोग्य विभागाची रूग्रवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Latest News