नाशिक जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य यतीन पगार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघ यांच्याशी चर्चा केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. तब्बल ५५ मिनीटांच्या या ऑडियो क्लिपमध्ये यतीन पगार यांनी ठाकुर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना ठाकुर समाजाच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या दिपीका चव्हाण, दिगत माजी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांच्याबाबत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे आढळून आले होते.

ठाकुर समाजाची व लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याबद्दल, तसेच अर्वाच्च्य भाषेत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करून ठाकुर समाजासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सटाणा पोलिसात तक्रार दिली.

ठाकुर समाज अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गात मोडत असल्याची तक्रार चव्हाण यांनी सटाणा पोलिसांकडे केली.सटाणा जायखेडा (ता. बागलाण) जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य यतीन पगार यांनी ठाकुर समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि ठाकुर समाजाच्या माजी आमदार दीपिका चव्हाणव माजी नगराध्यक्षा (कै.) सुलोचना चव्हाण यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून महिलांचा अपमान केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच महेश बाजीराव चव्हाण यांनी सटाणा पोलिस ठाण्यात (Police FIR) तक्रार दिली.

याबाबत सटाणा पोलिसांनी चव्हाण यांच्या तक्रारीवरून यतीन पगार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता पगार यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहेपोलिसांनी यतीन पगार यांच्याविरूद्ध अनुसुचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे….माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण या ठाकुर समाजाच्या असून, त्यांनी जनतेच्या हितासाठी तालुक्यात अनेक कामे केली आहेत. मात्र, यतीन पगार यांनी ठाकुर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, दीपिका चव्हाण व दिवंगत सुलोचना चव्हाण यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली आहे. याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. यात कोणतेही राजकारण अथवा दबावतंत्र नाही.

 महेश बाजीराव चव्हाण, तक्रारदार

बागलाण विधानसभेची निवडणूक अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून लढवून विजयी झाल्याने पाच वर्षे महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला बागलाणवासीयांनी काम करण्याची संधी दिली. मात्र, यतीन पगार यांनी मला व माझ्या दिवंगत सासूबाईंना अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून ठाकुर समाजाचा आणि एकप्रकारे सर्व महिलांचा अपमान केला आहे.

-दीपिका चव्हाण, सदस्य, राज्य महिला आयोग

Latest News