जेजुरी तीर्थक्षेत्राच्या संवर्धन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्री ठाकरे ची मान्यता…

बारामती : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्राचे जतन आणि संवर्धन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्रीयांनी आज मान्यता दिली. या विकास आराखड्या अंतर्गत मंदिराच्या संकुलाचे संवर्धन, परिसराचा विकास. येणाऱ्या भाविकासाठी सोयीसुविधा, जेजुरी आणि आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहेयासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदारपुरंदरचे आमदार संजय जगताप हे उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात सुमारे एकशे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे विकास आराखड्या अंतर्गत जेजुरी तीर्थत्रेत्राच्या परिसराचा विकास होणार आहे. मात्र, त्याच बरोबर यामध्ये गडाची ही डागडुजी होणार असल्याने जेजुरी गडाच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. मंदिराचे काम, पूर्व आणि उत्तर पायरी मार्ग, दीप माळी, कमाण यांची पूर्ण डाकडूजी करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.

Latest News