मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नी दिलेला यांनी शब्द मोडला- संभाजीराजे

मुंबई  सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींवर त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. राज्यसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मी मुंबईत आलो. माझी बोलायची मुळीच इच्छा नाही. माझ्या रक्तात, तत्वात ते नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठलंही स्मारक, पुतळा असेल तर दोघांनी तिथं जायचं. जर संभाजीराजे छत्रपती खोटं बोलत असेल तर सांगावं, असं सुरूवातीला संभाजीराजे यांनी सांगितलं.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरले आहे. उमेदवारीबाबतचा ड्राफ्ट तयार झाला होता. पण असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. 

मी मुंबईत आल्यानंतर ओबेरॉयमध्ये दोन मंत्री पाठविले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. पण मी नकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. वर्षावर आलात तर चर्चा करू शकतो. मीही त्यांचा मान राखत त्यांना भेटायला गेलो. तीन मुद्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा शिवसेनेत प्रवेश करा. माझ्याकडे एक प्रस्ताव त्यांना सांगितला. शिवसेनेची सीट असली तरी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवारी द्या. पण त्यांनी हे शक्य नाही, असं सांगितलं. मग त्यांनी आघाडीच्यावतीने शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यास तयारी दर्शवली. पण त्यासही मी नकार दिला. दोघांनाही दोन दिवस विचार करण्याचं ठरलं. पण दोन दिवसांनी त्यांच्याकडून निरोप आला. सुवर्णमध्य काढू, असा निरोप आल्याचे छत्रपतींनी सांगितले.

आमची मंत्र्यांच्या घरी बैठक झाली. मी आणि मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार ड्राफ्ट तयार झाला. मंत्र्यांचे हस्तलिखित आहे. ओबेरॉय हॉटेलमध्ये एक मंत्री, एक खासदार, त्यांचे स्नेही यांच्या मीटिंग ठरली. बैठकीआधी त्यांनी सांगितले, आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. पण मंत्री आणि खासदारांनी ड्राफ्टनुसार पुढे जाऊ असे सांगितले. ड्राफ्ट फायनल असल्याचे सांगत ते निघून गेल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

एवढा शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरात गेलो. कागदपत्रांची तयारी करण्यासाठी निघालो. कोल्हापूरात गेल्यानंतर समजले संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. जे खासदार बैठकीत होते, त्यांना फोन केला पण ते काहीही बोलू शकले नाहीत. मुख्यमत्र्यांना फोन केला, पण त्यांनी फोन घेतला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हतो. त्यांनी दिलेला शब्द मोडला, अशी नाराजी छत्रपतींनी व्यक्त केली.

Latest News