पहिले भिमथडी मराठी साहित्य संमेलन दौंडला होणार १७ व १८ जूनला संमेलनाचे आयोजन


पहिले भिमथडी मराठी साहित्य संमेलन दौंडला होणार१७ व १८ जूनला संमेलनाचे आयोजन
दौंड, दि. २४- पहिले राज्यस्तरीय भिमथडी मराठी साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील चौफुला येथे (ता.१७ व १८ जून) रोजी होणार आहे. दौंड तालुका भीमथडी साहित्य प्रतिष्ठान व मराठी साहित्य संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन संयोजन बैठक (ता.२३ मे) रोजी पाटस येथे पार पडली.
या बैठकीला यावेळी साहित्य प्रतिष्ठानचे संजय सोनवने,एम.जी.शेलार,राजू जगदाळे,सचिन रूपनवर,रविंद्र खोरकर,बाळासाहेब मुळिक,दिपक पवार,सुशांत जगताप,विठ्ठल सोडनवर,रामभाऊ नातू,सचिन आटोळे,हरिभाऊ बळी आदी उपस्थित होते.त्याच बरोबर लेखक,साहित्यिक,कवी दशरथ यादव,मराठी साहित्य संशोधन राष्ट्रिय परीषदेचे विश्वस्त राजाभाऊ जगताप,डॉ.भालचंद्र सुपेकर उपस्थित होते.
भिमथडी मराठी साहित्य संमेलनात संमेलन उद्घाटन समारंभ, ग्रंथ दिंडी, पुरस्कार वितरण सोहळा, कथा-कथन, परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे.या साहित्य संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी,साहित्यिक,कलावंत यांनी ८८०५५११०६० / ९८५०२०६९७७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान संमेलनाचे सचिव दिपक पवार यानी केले आहे.