संभाजी राजेनी अपक्ष निवडणूक लढवावी हि देवेद्र फडणवीस यांची खेळी : छत्रपती शाहू राजे

IMG_20220528_195020

छत्रपती संभाजी राजे नी अपक्ष निवडणूक लढवावी हि देवेद्र फडणवीस यांची खेळी

: कोल्हापूर :(परिवर्तनाचा सामना ) “कुठल्याही पक्षाने संभाजीराजे बाबत ठोस भूमिका न घेतल्याने त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. इतकेच नाही तर बहुजन समाजाच्या मतांत विभाजन व्हावे यासाठी भाजपाने जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप छत्रपती शाहू महाराज यांनी केला.जानेवारी महिन्यापासून संभाजीराजे खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. दीर्घकाळ लढाई करावी लागेल. हा संघर्ष खूप मोठा असल्याचं,” ते म्हणाले.दरम्यान, संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली.मात्र, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असं सांगण्यात आलं.संभाजीराजे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सहाव्या जागेच्या निवडणूकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपतींच्या उमेदवारीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. मात्र कोणत्याच पक्षाकडून होकार न आल्याने अखेर संभाजीराजेंनी आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं. दरम्यान संभाजीराजेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. अपक्षाच्या भूमिकेवर ठाम त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने सहाव्या जागेचा उमेदवार जाहीर केल्याने मराठा क्रांती संघटनेने नाराजी दर्शवली या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

Latest News