परराज्यातील उमेदवार,महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा अपमान – आशिष देशमुख

मुंबई :. इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सुर आळवला आहे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राज्यसभेच्य उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परराज्यातील उमेदवार महाराष्ट्रावर लादले. हा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा अपमान आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार यशस्वी होईल इतके संख्याबळ आहे. तसेच भाजपचे दोन उमेदवार यशस्वी होतील इतके संख्याबळ भाजपकडे आहे. काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी राज्यसभा उमेदवारीची आस ठेवली होती.

मात्र इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान, काँग्रेसकडे एक जागा होती. त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली असती तरी सगळ्यांचं समाधान झालं नसतं, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे

. मुकूल वासनिक यांना तिकिट देण्यात आलं असेल तर ते महाराष्ट्रातून देण्यात यावं, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी हायकमांडकडे केली होती.राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे

Latest News