केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढलेली आहे तरुणांनी आंदोलन उभं कराव :अण्णा हजारे

पुणे | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केंद्र सरकार विरोधात आवाज उठवत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं आहे का?, तरुणांनी आंदोलन उभं केलं पाहिजे. केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढलेली आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.दरम्यान, लोकायुक्त कायद्यावरून एकतर कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला होता. राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून देखील अण्णा हजारेंनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवला होता.

राज्य लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याचे समाधान आहे. लोकपाल लागू झाल्यावर एका वर्षात लोकायुक्त कायदा करायचा असा नियम होता. खूप चांगला मसुदा तयार झाला आहे. मी समाधानी आहे. हा मसुदा तयार होण्यास खूप उशीर झाला आहे. विधानसभेमध्ये लवकरच याचे कायद्यात रूपांतर होईल, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यावरून महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लोकायुक्त कायद्यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं होतं.

त्यातच आता लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाल्याने अण्णा हजारेंनी समाधान व्यक्त केलं आहे

Latest News