*११ जून रोजी ‘ कलरलेस ‘ चे सादरीकरण*——————————– ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘डिफरंट स्ट्रोक्स ‘ प्रस्तुत ‘ कलरलेस ‘ हे भरतनाट्यम,अभिनय आणि चित्रकलेचा एकत्रित आविष्कार असलेले प्रायोगिक सादरीकरण शनीवार, ११ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित केले आहे.संकल्पना सुचेता जोशी यांची आहे. प्रकाश योजना सचिन लेले यांची असून या सादरीकरणाला आनंद चाबुकस्वार यांनी आवाज ( व्हॉईस ओव्हर ) दिला आहे. १३ युवती यात सहभागी होणार आहेत.
कलरलेस हा या पूर्वग्रहांनी त्रासलेल्या मनाचा व पूर्वग्रहांमधील संवाद आहे. मन ज्यावेळा तटस्थपणे आपल्या चुकांकडे बघते, आपण असे का वागतो याचा मागोवा घेते, तेव्हा त्याला काय दिसते त्याचे प्रतिबिंब कलरलेस मध्ये दिसेल.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२४ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली…….