पुण्याची डॉक्टर. मृणाली शिरसाट यांची नायब तहसीलदार पदी

फक्त सकारात्मक विचार, स्वतःचे ध्येय आणि परिवारातील मंडळीचा पाठींबा असेल तर नक्कीच ती यश मिळवते…..

पुणे :. ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असेल यशाला गवसणी घालण्यासाठी आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. वडगावशेरी येथे राहणाऱ्या डॉक्टर. मृणाली अशोकराव शिरसाट यांची नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याने परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहें

मृणाली चे प्राथमिक शिक्षण माळी बाभुळगाव पाथर्डी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले .त्या नंतर त्याचे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पुण्यातील खराडी येथील सुंदर बाई मराठे विद्यालय या शाळेत घेतले .आजोबा श्री शहादेव कराड हे पुणे मनपा मध्ये प्राथमिक शिक्षक होते. दरम्यानच्या काळात वडिलांचे छत्र हरविल्या नंतर आईने व आजोबांनी तिचे शिक्षण पुढे चालू ठेवले..ग्रामीण भागातून आलेली ही मुलगी अतिशय गरीब मनमिळाऊ आणि हुशार होती..सर्वच परीक्षेत ती शाळेत पहिली यायची. त्यांना विद्यालयाने आदर्श विद्यार्थिनी म्हणून पण गौरविले होते.

. तिला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.६० एव्हढे गुण मिळून ती बोर्डात गुणवत्ता यादीत आली होती .बारावी मध्ये तिने पुण्यातील नुमवी शाळेत प्रवेश घेतला.पुढे तिने BDS पदवी घेऊन शासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली…UPSC/ MPSC परीक्षेची ती तयारी करत होती

लग्नानंतर ही तिने तिचे प्रयत्न चालूच ठेवले होते.. पाच महिन्यांची गरोदर असताना त्यांनी परीक्षा दिली होती तर नवव्या महिन्यात मुलाखती साठी गेल्या त्या मध्ये उत्तीर्ण झाल्या आणि अवघ्या चारच त्यांची प्रसूती झाली. मुलीचा जन्म आणि नायब तहसीलदार पदी निवड या दुहेरी आनंद झाल्याचे त्यांचे पती रामनाथ आंधळे ( मेडिकल ऑफिसर)यांनी सांगितले. डॉ. मृणाली शिरसाट : प्रत्येक मुलगी अडचणी वर मात करून पुढे जाऊ शकते .

Latest News