आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा- खासदार असदोद्दीन ओवोसी

नांदेड :. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कतारमध्ये अडवल्यानंतर दहा दिवसांनी मुस्लीम धर्मगुरुंचा अपमान केल्या प्रकरणात भाजप प्रवक्त्यावर निलंबनाची कारवाई केली. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे विदेश दौऱ्यावर कतारच्या विमानात असताना तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्याने आमच्या धर्मगुरुंचा अपमान केल्यामुळे माफी मागा, मगच प्रवासाला परवानगी देऊ असा निरोप कतार सरकारने दिला होता. हा भारतचा अपमान आहे, असेही ओवेसी म्हणाले. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे.

यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतांची जुळवाजुळव आणि अपक्ष, छोट्या पक्षांना गळ घालण्याची कसरत सुरू आहे.  एमआयएमकडे दोन मते आहेत, आपला पाठिंबा कुणाला असेल असा प्रश्न खासदार असदोद्दीन ओवोसी यांना विचारला असता आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीला केले.

अद्याप आपल्याशी किंवा आमच्या पक्षाच्या आमदारांशी कुणी संपर्क साधलेला नाही. त्यांना आमच्या मतांची गरज असेल तर ते संपर्क साधतील.येत्या दोन दिवसांत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले. नांदेड येथे पत्रकारांशी बलोतांना ओवेसी यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडलीभाजपच्या प्रवकत्याने मुस्लीम धर्मगुरुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून भारताचा निषेध केला जात आहे.

ओवेसी म्हणाले, राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्याशी संपर्क केला नाही किंवा आमच्या कुठल्याच आमदार, नेत्याशी देखील संपर्क केलेला नाही. मात्र राज्यसभा निवडणूकीच्या संदर्भात आम्ही आमची भुमिका एक दोन दिवसात स्पष्ट करु. त्यांना गरज असेल तर ते आमच्याशी संपर्क करतील.

Latest News